मुंबई- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवासांसाठी संचारबंदी लागू केली आहे. मोदी यांच्या या निर्णयाचे समर्थन इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केवीन पीटरसनने केलं आहे. महत्वाची बाब म्हणजे, पीटरसनने हात जोडून चक्क हिंदी भाषेतून भारतीयांना आवाहन केलं आहे.
केवीन पीटरसनने एक ट्विट केलं आहे. त्यात तो म्हणतो, 'मी ऐकलं की, तुमची अवस्था आमच्या सारखी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. माझं तुम्हा सर्वांना आवाहन आहे की, तुम्ही याचं पालन करा. आपण सगळे एकजूट होऊन कोरोनाला हरवू आणि यातून बाहेर पडू. कृपा करुन कोणीही घराबाहेर पडू नका आणि सुरक्षित राहा.'