मुंबई- कोरोनामुळे सर्व स्पर्धा रद्द झाल्याने, खेळाडू आपापल्या घरात आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनही सध्या घरातच आहे. पण, तो घरात राहून देखील क्रिकेटपासून लांब राहू शकला नाही. कारण त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो आपला कुत्रा सँडीसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे सँडी हवेत उडी घेत कॅच पकडतो.
क्रिकेट विश्वात न्यूझीलंडचे खेळाडू क्षेत्ररक्षणात सरस मानले जातात. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनही उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानला जातो. पण त्याचा कुत्रादेखील सुपर क्षेत्ररक्षक असल्याचे समोर आलं आहे. केनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला असून यात त्याचा कुत्रा सँडी हवेत उडी घेत चेंडू पकडताना दिसत आहे.
दरम्यान, कोरोनामुळे क्रीडा जगतातील जवळपास सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहे. यामुळे सर्व खेळाडू घरीच कुटुंबियासोबत वेळ घालवत आहेत.