नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. यावेळी, आरोग्य सेवेशी संबंधित पोलिसांची आणि लोकांची भूमिका मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या लोकांच्या योगदानाचे कौतुक केले आहे. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यानेही मुंबई पोलिसांना सलाम केला.
अष्टपैलू क्रिकेटपटू पांड्याचा मुंबई पोलिसांना सलाम
मुंबई पोलिसांच्या अधिकृत हँडलवरील ट्विटला पांड्याने उत्तर दिले. मुंबई पोलिस आणि इतर अधिकाऱयांना खूप प्रेम आणि शुभेच्छा. आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी ते खूप प्रयत्न करीत आहे, असे पांड्याने ट्विटमधून म्हटले.
अष्टपैलू क्रिकेटपटू पांड्याचा मुंबई पोलिसांना सलाम
मुंबई पोलिसांच्या अधिकृत हँडलवरील ट्विटला पांड्याने उत्तर दिले. मुंबई पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांना खूप प्रेम आणि शुभेच्छा. आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी ते खूप प्रयत्न करीत आहे, असे पांड्याने ट्विटमधून म्हटले.
मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांचे कार्य दाखवण्यात आले होते. ‘तुम्हाला वाटते की लॉकडाउन खूप लांब चालू आहे का? विचार करा जर आम्हीपण घरी असतो तर काय झाले असते?’, असे या व्हिडिओमध्ये म्हटले होते.