कराची- कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधील १४ परदेशी खेळाडूंनी स्पर्धा अर्ध्यातून सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी आपले घर गाठणे पसंत केले आहे.
याविषयी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'प्रत्येक खेळाडूला स्पर्धा अर्ध्यातून सोडून परत जाण्याचा अधिकार आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे इंग्लंडच्या काही खेळाडूंनी आपल्या संघमालकांना आम्ही परत जाणार असल्याचे कळवले आहे.'
हे खेळाडू आपल्या घरी परतणार -
अॅलेक्स हेल्स (कराची किंग्ज), रेले रुसो आणि जेम्स विंस (मुल्तान सुल्तांस), टॉम बॅटन, कार्लोस ब्रॅथवेट, लियाम डॉसन, लुईस ग्रेगरी, लियाम लिविंगस्टोन (पेशावर झल्मी), जेसन रॉय, टायमल मिल्स (क्वेटा ग्लॅडिएटर्स), कॉलिन मुन्रो, दाविद मालन आणि ल्यूक राँची (इस्लामाबाद यूनाइटेड) या खेळाडूंनी पीएसएल अर्ध्यातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. डेन स्टेननेही आपण पीएसएल सोडणार असल्याचे ट्विट केले आहे.