मुंबई - देशात कोरोना विषाणूचा प्रसार दिवसागणिक वाढत चालला आहे. ही बाब चिंताजनक असून भारतासाठी पुढील दोन आठवडे महत्वाचे आहे. यात आपण योग्य ते सहकार्य केले, तर हे आटोक्यात आणू शकतो, असे मत भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने केले आहे.
अश्विनने ट्विटरच्या माध्यमातून देशवासियांना आवाहन केलं आहे. तो म्हणतो की, 'आपल्या देशवासियांसाठी पुढील दोन आठवडे सर्वात महत्वाचे आहे. यात आपण एकत्रित न येता, घरीच राहिले पाहिजे. आपण जर या दोन आठवड्यात योग्य ती खबरदारी घेतली तर लवकरच या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत मिळू शकते.'
दरम्यान, कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे जमावबंदीचे आदेश देण्यात आले. पण लोकांनी जमावबंदीच्या नियमांची पायमल्ली करत रस्त्यावर फिरणे सुरूच ठेवले. तेव्हा महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्ली सरकारने संचारबंदी लागू केली. देशात कोरोना रुग्णांचा आकडा ४०० पार पोहचला आहे तर महाराष्ट्रात ९७ कोरोनाचे रुग्ण आहेत.
हेही वाचा -जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण?...विंडीजच्या चंद्रपॉलने दिलं 'हे' उत्तर
हेही वाचा -भारतीय क्रिकेटपटू म्हणतो, लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करायचं की, जेलमध्ये जायचं हे तुम्हीच ठरवा!