महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कोरोना : कोलकाता नाईट रायडर्सने दिला मदतीचा हात - kolkata knight riders fight corona news

केकेआरने पंतप्रधान निधीसाठी ही देणगी दिली. आयपीएलची फ्रेंचायझी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचे मालक शाहरुख खान, जुही चावला, गौरी खान आणि जय मेहता पीएम रिलीफ फंडामध्ये योगदान देण्यास वचनबद्ध आहेत, असे केकेआरने निवेदनात म्हटले आहे.

Corona virus kolkata knight riders donated
कोलकाता नाईट रायडर्सने दिला मदतीचा हात

By

Published : Apr 3, 2020, 4:40 PM IST

Updated : Apr 3, 2020, 5:16 PM IST

नवी दिल्ली -इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्स संघाने (केकेआर) कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपले योगदान दिले आहे. बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि कंपनीच्या इतर लोकांनी मिळून ही देणगी दिली असल्याचे केकेआरने संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

केकेआरने पंतप्रधान निधीसाठी ही देणगी दिली. आयपीएलची फ्रेंचायझी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचे मालक शाहरुख खान, जुही चावला, गौरी खान आणि जय मेहता पीएम रिलीफ फंडामध्ये योगदान देण्यास वचनबद्ध आहेत, असे केकेआरने निवेदनात म्हटले आहे.

या मदतीची माहिती केकेआरने ट्विटरवरून दिली. अशा परिस्थितीत जेव्हा आपण सर्व आपल्या घरात असतो, तेव्हा बरेच लोक आहेत जे आपल्या सुरक्षेसाठी काम करतात. त्यांना निरोगी ठेवण्यासाठी आमचे छोटेसे योगदान आहे. एकत्रितपणे आपण या रोगाशी लढू शकतो, असे केकेआरने म्हटले आहे.

Last Updated : Apr 3, 2020, 5:16 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details