महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

अँडरसनचा न्यूझीलंडला 'रामराम', अमेरिकेकडून खेळणार क्रिकेट - कोरी अँडरसन लेटेस्ट न्यूज

अँडरसनची होणारी पत्नी अमेरिकेची असून तिचे नाव मेरी शामबर्गर आहे. या दोघांनी कोरोनादरम्यानचा बहुतेक वेळ टेक्सासमध्ये घालवला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, अमेरिकेचा हेतू एकदिवसीय संघाचा दर्जा मिळवण्याचा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत क्रिकेटपटूंचा समावेश करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

corey anderson confirms new zealand retirement
अँडरसनचा न्यूझीलंडला 'रामराम', अमेरिकेकडून खेळणार क्रिकेट

By

Published : Dec 5, 2020, 1:25 PM IST

ऑकलंड -कोरी अँडरसनने न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो अमेरिकेसाठी क्रिकेट खेळणार आहे. २९ वर्षीय अँडरसनने वनडे क्रिकेटमधील दुसरे वेगवान शतक ठोकले आहे. तो अमेरिकेत मेजर लीग टी-२० क्रिकेट खेळून नव्या इनिंगची सुरुवात करेल.

कोरी अँडरसन

हेही वाचा -रवींद्र जडेजा संघातून 'आऊट', 'या' खेळाडूला संघात स्थान

अँडरसनची होणारी पत्नी अमेरिकेची असून तिचे नाव मेरी शामबर्गर आहे. या दोघांनी कोरोनादरम्यानचा बहुतेक वेळ टेक्सासमध्ये घालवला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, अमेरिकेचा हेतू एकदिवसीय संघाचा दर्जा मिळवण्याचा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत क्रिकेटपटूंचा समावेश करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कोरीव्यतिरिक्त पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज समी अस्लमही या संघात समाविष्ट होऊ शकतो. अमेरिकेत तीन वर्ष वास्तव्य केल्यानंतर हे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेचे प्रतिनिधित्व करू शकतात.

३६ चेंडूत १०० धावा -

अँडरसन यावर्षी न्यूझीलंडमध्ये स्थानिक क्रिकेट खेळला नाही. तो गेल्या वर्षी ऑकलंडकडून सुपर स्मॅश स्पर्धा खेळला. २०१४मध्ये त्याने वनडेमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावले होते. त्याने ३६ चेंडूत १०० धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर २०१५मध्ये एबी डिव्हिलियर्सने त्याचा विक्रम मोडला. २०१५च्या वर्ल्डकपमध्येही कोरी संघाचा महत्त्वाचा खेळाडू होता. त्याने ३३च्या सरासरीने २३१ धावा केल्या आणि १४ बळी घेतले.

ABOUT THE AUTHOR

...view details