दिल्ली - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस मुकण्याची शक्यता आहे. भारताविरुद्ध मोहालीत खेळण्यात आलेल्या तिसऱ्या वनडेत स्टॉयनिसच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो चौथा सामनाही खेळू शकला नव्हता.
अखेरच्या वनडे सामन्यात मार्कस स्टॉयनिस मुकण्याची शक्यता - india
भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्टॉयनिसच्या अंगठ्याला दुखापत झाली होती
स्टॉयनिसच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमधून तो अद्याप सावरलेला नाही. यामुळे पाचव्या वनडेला स्टॉयनिसचे मुकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ऑस्ट्रेलियन संघासाठी मोठा झटका असू शकतो. स्टॉइनिसच्या संघसहकारी पीटर हॅंड्सकॉम्ब एका पत्रकार परिषदेत म्हणाला होता की, स्टॉयनिस पाचव्या सामन्यात खेळू शकेल असे वाटत होते, मात्र, त्याच्या दुखापतीमुळे त्याला बॅट पकडणेही अवघड जात आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात स्टॉयनिसच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध चालू असलेल्या ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि चौथा सामना जिंकून जबरदस्त पुनरागमन केले. यासह कांगारूंनी मालिकेत २-२ अशी बरोबरीही साधली आहे. या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना आज दिल्लीच्या फिरोजशाह कोटला क्रिकेट मैदानावर रंगणार आहे.