महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

दुखापतीतीतून सावरणारा बुमराह म्हणतोय, मी पुन्हा येतोय... - दुखापतीतून सावरणारा बुमराहने दिले संघात परतण्याचे संकेत

विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघाने वेस्ट इंडीजचा दौरा केला. या दौऱ्यातील कसोटी मालिकेदरम्यान, बुमराहच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला उपचारासाठी बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकासोबत इंग्लंडला पाठवण्यात आले. या उपचारादरम्यान, बुमराहवर शस्त्रक्रिया करावी लागणार अशी माहिती मिळत होती. शस्त्रक्रिया झाल्यास बुमराह पुढील काही काळ क्रिकेटपासून लांब राहणार होता. मात्र, बीसीसीआयने शस्त्रक्रियेची आवश्यकता नसल्याचे सांगितले.

दुखापतीतीतून सावरणारा बुमराह म्हणतोय, मी पुन्हा येतोय...

By

Published : Oct 29, 2019, 4:36 PM IST

नवी दिल्ली - भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आपल्या पाठीच्या दुखापतीमधून सावरत आहे. बुमराह दुखापतीवर उपचारासाठी लंडनमध्ये रवाना झाला होता आणि तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता होती. मात्र, बीसीसीआयने बुमराहवर शस्त्रक्रिया करावी लागणार नसल्याचे स्पष्ट केले. या दरम्यान, बुमराहने आपल्या ट्विटर अकाउंटवर, जिममध्ये वर्कऑऊट करतानाचा फोटो शेअर करत संघात पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.

विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघाने वेस्ट इंडीजचा दौरा केला. या दौऱ्यातील कसोटी मालिकेदरम्यान, बुमराहच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला उपचारासाठी बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकासोबत इंग्लंडला पाठवण्यात आले. या उपचारादरम्यान, बुमराहवर शस्त्रक्रिया करावी लागणार अशी माहिती मिळत होती. शस्त्रक्रिया झाल्यास बुमराह पुढील काही काळ क्रिकेटपासून लांब राहणार होता. मात्र, बीसीसीआयने शस्त्रक्रियेची आवश्यकता नसल्याचे सांगितले.

यामुळे बुमराह लवकरच संघात पुनरागमन करू शकतो. याचे संकेत त्याने जिममधील फोटो शेअर करून दिले आहेत. दरम्यान, वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर बुमराहला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत दुखापतीमुळे संघात स्थान मिळाले नव्हते. २०२० साली भारताच्या न्युझीलंड दौऱ्यापर्यंत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details