महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारत-पाकिस्तान विश्वकरंडक सामन्यावर आज अंतिम निर्णय - भारत

भारत-पाकिस्तान यांच्यातील विश्वकरंडकातील सामन्याबाबत अनिश्चितता कायम आहे. आज सीओेएच्या (COMMITTEE OF ADMINISTRATORS) बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

भारत पाकिस्तान २

By

Published : Feb 23, 2019, 8:57 AM IST

मुंबई- पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वातावरण चिघळले आहे. भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याबाबत कडक धोरण अवलंबले आहे. यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील विश्वकरंडकातील सामन्याबाबत अनिश्चितता कायम आहे. आज सीओेएच्या (COMMITTEE OF ADMINISTRATORS) बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

एएनआयच्या सूत्रांनुसार, विश्वकरंडकात पाकिस्तानसोबत खेळण्याचा निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली समितीची सीओएने बैठक बोलावली आहे. या बैठकीत पाकिस्तानसोबत यापुढे क्रिकेटचे सबंध ठेवण्यासाठी विचार करण्याबरोबरच विश्वकरंडकात पाकिस्तानसोबत खेळायचे आहे का नाही, यावर चर्चा करण्यात येणार आहे. यासाठी क्रीडा मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांच्याकडून सल्ला घेण्यात येणार आहे. बीसीसीआय बैठकीनंतर अंतिम निर्णय घेणार आहे.

याआधी मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी आयसीसीला ई-मेल करुन पाकिस्तानला विश्वकरंडकातून बाहेर करण्याची मागणी करण्याची तयारी केली आहे. बीसीसीआयचे अधिकारी याबाबत विचार करत आहेत. ई-मेलमध्ये भारतात पाकिस्तान विरुद्ध न खेळण्याचा अनेकांचा सूर आहे, दहशतवादाच्या सबंधित मुद्यावर भारत कोणतीही तडजोड करणार नाही, या मुद्याला धरुन भारत पाकिस्तानविरुद्ध आयसीसीकडे आपले मत मांडणार आहे.

इंग्लंड येथे होणाऱ्याविश्वकरंडकात भारत-पाकिस्तान यांच्यात १६ जूनला सामना होणार आहे. भारताने सामन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यास पाकिस्तानच्या खात्यात २ गुण जमा होतील. याचे नुकसान भारतीय संघाला होऊ शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details