महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

तब्बल २५ वर्षांतर दादोजी कोंडदेव मैदानात रंगला सामना, दिलीप वेंगसरकर यांनी केली नाणेफेक - दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह

तब्बल २५ वर्षांनी ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहात सी.के. नायडू चषकातील (प्रथम श्रेणी) सामना खेळविला जात आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या क्रिकेट सामन्याची सुरूवात दिलीप वेंगसरकर यांनी नाणेफेक करुन केली.

CK Nayudu Trophy 2020 : mumbai vs bengal match started in Dadoji Konddev Stadium thane
तब्बल २५ वर्षांतर दादोजी कोंडदेव मैदानात रंगला सामना, दिलीप वेंगसरकर यांनी केली नाणेफेक

By

Published : Jan 5, 2020, 8:54 PM IST

ठाणे - दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह हे क्रिकेटसाठी उत्तम अशी खेळपट्टी असलेले मैदान आहे, या मैदानात फक्त क्रिकेटच खेळले पाहिजे. उत्तम असे व्यासपीठ ठाण्यातील क्रिकेटप्रेमींना या खेळपट्टीच्या निमित्ताने उपलब्ध झाले आहे. अनेक वर्षानंतर या ठिकाणी प्रथम श्रेणीचा सामना होत असून यापुढेही असे सामने येथे खेळविले गेले पाहिजे, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन नाणेफेक करुन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

दिलीप वेंगसकर बोलताना...

तब्बल २५ वर्षांनी ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहात सी.के. नायडू चषकातील (प्रथम श्रेणी) सामना खेळविला जात आहे. या सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती अमर पाटील शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, नगरसेविका परिषा सरनाईक, उपायुक्त संदीप माळवी, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य विहंग सरनाईक, नदीम मेमन, माजी रणजीपटू तुकाराम सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महापौर नरेश म्ह्सके यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहातील क्रिकेटची खेळपट्टी ही नदीम मेमन यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय दर्जाची तयार करण्यात आली आहे. तब्बल २५ वर्षांनी या खेळपट्टीवर प्रथम श्रेणीचा, मुंबई विरुध्द बंगाल यांच्यात सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य विहंग सरनाईक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. ५ ते ८ जानेवारी दरम्यान खेळवण्यात येत असलेला सामना पाहण्यासाठी ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

हेही वाचा -बाप रे...! रणजी सामन्यादरम्यान मैदानात शिरले दोन साप

हेही वाचा -अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉईनिसला साडे पाच लाखांचा दंड!

ABOUT THE AUTHOR

...view details