लंडन - नुकतीच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील प्रतिष्ठित अॅशेस मालिका संपली आहे. अखेरच्या पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडने १३५ धावांनी विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडली. दरम्यान, ही मालिका गाजली ती स्टीव्ह स्मिथ आणि अष्टपैलू कामगिरी करणारा बेन स्टोक्समुळे. स्टीव्ह स्मिथने मालिकेत ७७४ धावा चोपल्या तर बेन स्टोक्सने अशक्य वाटणारा अविश्वसणीय सामना जिंकून दाखवला. दरम्यान, ही मालिका आणखी एका वेगळ्या विषयावरुन गाजली.
अखेरच्या पाचव्या कसोटी सामन्यात, ख्रिस वोक्सने आपल्या कसोटी कारकिर्दीत ८६७ षटकानंतर पहिला नो बॉल टाकला. होय, तब्बल ५२०० चेंडूनंतर पहिला नो बॉल. ख्रिसच्या त्या बॉलवर फलंदाज बाद झाला. मैदानातील पंचाना तो चेंडू नो बॉल असल्याचे कळले नाही. तेव्हा तिसऱ्या पंचानी ती चूक मैदानावरिल पंचांना सांगितली. तेव्हा तो चेंडू नो बॉल देण्यात आला.