कराची - एकीकडे कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला हादरा दिला. तर, दुसरीकडे पाकिस्तानमध्ये एक खेळाडूने झंझावाती शतक लगावत सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. सध्या पाकिस्तानात खेळवली जाणारी पीएसएल म्हणजे पाकिस्तान सुपर लीग अंतिम टप्प्यात असून या लीगमध्ये ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस लिनने ५५ चेंडूत नाबाद ११३ धावा कुटल्या. आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने लिनला २ कोटींच्या बोलीवर आपल्या संघात सामील करून घेतले आहे.
मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचे पाकिस्तानात तुफानी शतक..पाहा व्हिडिओ - ख्रिस लिन पीएसएल न्यूज
पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) ख्रिस लिन लाहोर कलंदर्सकडून खेळतो. या स्पर्धेतील बाद फेरीचा सामना मुलतान सुलतान्स आणि लाहोर कलंदर्स यांच्यात खेळवण्यात आला. तेव्हा लिनने ही आतषबाजी खेळी केली. त्याने १२ चौकार आणि ८ षटकार लगावले.

खुशदिल शाहच्या नाबाद ७० धावांच्या खेळीमुळे मुलतान सुलतान्स संघाने २० षटकात लाहोर संघाला १८७ धावांचे आव्हान दिले. लिनच्या झंझावाती शतकाच्या जोरावर लाहोरने हे आव्हान १८.५ षटकात १ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयामुळे लाहोर कलंदर्सला स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे.
लाहोरने उपांत्य फेरीत प्रवेश केला असला तरी, त्यांना मोठा धक्का बसला आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ख्रिस लिन या महत्वाच्या सामन्यापूर्वी मायदेशी परतला आहे.