महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पोटदुखीतून सावरला पंजाबचा 'धाकड' फलंदाज, नेट्समध्ये करतोय सराव - Chris Gayle KXIP news

किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या अधिकृत ट्विटरवर गेलबद्दल माहिती दिली आहे. ख्रिस गेल पोटदुखीपासून सावरल्यानंतर प्रशिक्षणासाठी मैदानात परतला आहे.

Chris Gayle  recovers from food poisoning and he likely to play against RCB
पोटदुखीतून सावरला पंजाबचा 'धाकड' फलंदाज, नेट्समध्ये करतोय सराव

By

Published : Oct 13, 2020, 5:29 PM IST

दुबई -आयपीएल फ्रेंचायझी किंग्ज इलेव्हन पंजाबचा 'धाकड' फलंदाज ख्रिस गेल पोटदुखीतून सावरल्यानंतर प्रशिक्षणासाठी मैदानात परतला आहे. गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यासाठी गेलला आता प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.

किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या अधिकृत ट्विटरवर गेलबद्दल माहिती दिली आहे. गेलने या मोसमात आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. पंजाबचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. पंजाबचे सहाय्यक प्रशिक्षक वसीम जाफर म्हणाले, "ख्रिस गेल सज्ज असून तो मैदानात जाण्यासाठी उत्सुक आहे. तो खरोखरच उत्तम प्रशिक्षण घेत आहे. नेटमध्ये तो खूप चांगला सराव करताना दिसत आहे."

अन्नातून विषबाधा झाल्यामुळे गेलला ८ ऑक्टोबरला झालेला सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना खेळता आला नाही . संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळेने गेलच्या पोटदुखीबद्दल माहिती दिली होती. आयपीएलमध्ये पंजाबला अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही. फलंदाजीमध्ये पंजाबची समस्या आहे. कर्णधार लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला धावा करता आलेल्या नाहीत. पंजाबच्या संघाची फलंदाजीची मधली फळी कमकुवत आहे. त्यामुळे गेलला संघात स्थान दिल्यावर संघाला नक्कीच फायदा होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details