महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२१ : असा पराक्रम फक्त ख्रिस गेलच करू शकतो, 'या' विक्रमापासून रोहित, विराटसह मातब्बर कोसो दूर - राजस्थान वि. पंजाब सामना

ख्रिस गेलने आयपीएलध्ये आतापर्यंत १३२ सामन्यात ३४९ षटकार खेचले आहेत. त्याला ३५० षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या एका षटकाराची गरज आहे. तो आजच्या सामन्यात षटकार ठोकत हा विक्रम आपल्या नावे करू शकतो. विशेष म्हणजे या विक्रमाच्या यादीत गेलच्या आसपास कोणताच खेळाडू नाही.

chris gayle needs-to-hit-one-more-six-to-become-the-first-batsman-to-hit-350-sixes-in-ipl
IPL २०२१ : युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलला आजच्या सामन्यात 'हा' विक्रम करण्याची संधी

By

Published : Apr 12, 2021, 3:58 PM IST

मुंबई - आयपीएल २०२१ मध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यात पंजाबचा युनिव्हर्स बॉस अशी ओळख असलेल्या ख्रिस गेलला आपल्या नावे एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

ख्रिस गेलने आयपीएलध्ये आतापर्यंत १३२ सामन्यात ३४९ षटकार खेचले आहेत. त्याला ३५० षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या एका षटकाराची गरज आहे. तो आजच्या सामन्यात षटकार ठोकत हा विक्रम आपल्या नावे करू शकतो. विशेष म्हणजे या विक्रमाच्या यादीत गेलच्या आसपास कोणताच खेळाडू नाही.

गेलनंतर या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा खेळाडू एबी डिव्हिलियर्सचे नाव आहे. डिव्हिलियर्सने आतापर्यंत २३७ षटकार खेचले आहेत. महेंद्रसिंह धोनी २१६ षटकारांसह या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. रोहित शर्मा पाचव्या स्थानी असून त्याच्या नावे २१४ षटकार आहेत. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली देखील या यादीत असून तो २०१ षटकारांसह पाचव्या स्थानी विराजमान आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

ख्रिस गेलची आयपीएल कारकिर्द

ख्रिस गेलने आयपीएलमध्ये १३२ सामने खेळली आहेत. यात त्याने १५०.११ च्या स्ट्राईट रेटने ४ हजार ७७२ धावा केल्या आहेत. गेल आयपीएलच्या मागील हंगामात लयीत होता. त्याने सात सामन्यात १३७.१४ च्या स्ट्राईट रेटने आणि ४१ हून अधिकच्या सरासरीने २८८ धावा केल्या होत्या. गेल तीच लय कायम राखत आजच्या सामन्यात गेल मोठी खेळी करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा -IPL २०२१: शिखर धवन, अश्विन आणि 'वाथी कमिंग' गाणं, पाहा व्हिडिओ

हेही वाचा -वेल डन बॉईज! IPL मध्ये केकेआरच्या विजयाचे शतक; शाहरूखने केलं कौतुक

Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details