मुंबई - ख्रिस गेल क्रिकेट विश्वात स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याची वयाच्या ४१व्या वर्षी देखील मैदानात दहशत आहे. ख्रिस गेल सध्या आयपीएल स्पर्धेसाठी भारतात आहे. पंजाब किंग्ज संघाचा सदस्य असलेला गेल आयपीएलमध्ये चौकार-षटकारांची आतिषबाजी करण्यासाठी सज्ज आहे. पण, त्याआधी गेलचं 'जमैका टू इंडिया' हे गाणं रिलीज झालं आहे.
प्रसिद्ध रॅपर एमिवे बंटाय याच्यासोबत गेलने हे गाणं गायलं आहे. गेलचं हे गाणं हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये आहे. गेलनं इंग्रजीमध्ये तर एमिवे याने हिंदीमध्ये हे गाणं गायले आहे. टोनी जेम्स यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. गेलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे गाणं शेअर केलं आहे. आयपीएल स्पर्धेच्या पूर्वीच हे गाणं लोकप्रिय होत आहे.