महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

निवृत्ती घेतलेल्या मितालीला 'हा' क्रिकेटपटू म्हणतो, 'तू खुप.. - चेतेश्वर पुजाराने

पुजाराने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'टी-२० मधील चांगल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसाठी तुझे अभिनंदन. तू खुप प्रेरणादायी आहेस. विशेषत: हजारो मुलींचे तू प्रेरणास्थान आहेस.' ३६ वर्षीय मितालीने ३२ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे.

निवृत्ती घेतलेल्या मितालीला 'हा' क्रिकेटपटू म्हणतो, 'तू खुप..

By

Published : Sep 4, 2019, 7:36 AM IST

नवी दिल्ली -भारताची अव्वल महिला खेळाडू मिताली राजने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निवृत्तीनंतर, आणि तिने दिलेल्या क्रिकेटमधील योगदानानंतर विविध क्षेत्रातील लोकांनी तिचे आभार मानले आहेत. टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजारानेदेखील तिचे ट्विटरवरुन कौतुक केले आहे.

हेही वाचा -मिताली राजचा टी-२० क्रिकेटला अलविदा, आता 'या' कामावर देणार लक्ष

पुजाराने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'टी-२० मधील चांगल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसाठी तुझे अभिनंदन. तू खुप प्रेरणादायी आहेस. विशेषत: हजारो मुलींचे तू प्रेरणास्थान आहेस.' ३६ वर्षीय मितालीने ३२ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे.

मिताली आता एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेवर लक्ष देणार आहे. तिने ३२ टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये तीन टी-२० विश्वकरंडक स्पर्धांचा समावेश आहे. तिने २०१२, २०१४ आणि २०१६ च्या टी -२० विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. मात्र, तिच्या नेतृत्वाखाली भारताने एकदाही विश्वकरंडक उंचावलेला नाही.

८८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये मितालीने २३६४ धावा केल्या आहेत. या धावा करताना ३७.५२ ची तिची सरासरी राहिली आहे. या धावांमध्ये मितालीच्या १७ अर्धशतकांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details