नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे सर्व खेळाडू आपापल्या घरात कुटुंबीयासोबत वेळ घालवत आहेत. काही दिवसांपूर्वी, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्याची पत्नी अनुष्का शर्माकडून केस कापून घेतले होते. आता भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारानेही आपल्या पत्नीकडून केस कापून घेतले आहेत.
चेतेश्वर पुजाराचा पत्नीकडून हेअरकट! ..फोटोला दिले मजेशीर कॅप्शन - pujara gets haircut from wife
पुजाराने केस कापतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून या फोटोला त्याने भन्नाट कॅप्शन दिले आहे. ''जेव्हा तुम्ही 99 धावांवर फलंदाजी करता, तेव्हा एकेरी धाव घेण्यासाठी आपल्या सहकारी फलंदाजावर विश्वास ठेवणे आणि केस कापत असलेल्या आपल्या पत्नीवर विश्वास ठेवणे, यात नेमके धाडसी काय आहे?'', असा प्रश्न पुजाराने या कॅप्शनमध्ये चाहत्यांना विचारला आहे.
पुजाराने केस कापतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून या फोटोला त्याने भन्नाट कॅप्शन दिले आहे. ''जेव्हा तुम्ही 99 धावांवर फलंदाजी करता, तेव्हा एकेरीसाठी धाव घेण्यासाठी आपल्या सहकारी फलंदाजावर विश्वास ठेवणे आणि केस कापत असलेल्या आपल्या पत्नीवर विश्वास ठेवणे, यात नेमके धाडसी काय आहे?'', असा प्रश्न पुजाराने या कॅप्शनमध्ये चाहत्यांना विचारला आहे.
कोरोनामुळे जगभरातील जवळपास सर्व स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे खेळाडू आपापल्या घरी कुटुंबियासोबत वेळ घालवत आहेत.