विशाखापट्टणम - आयपीएलच्या बाराव्या सत्रात शुक्रवारी खेळल्या गेलेल्या क्वॉलिफायर-२ सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपीटल्सवर ६ विकेट राखून विजय मिळवत आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली. या विजयासह चेन्नईच्या संघामे आयपीएलमधील एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने गाठली विजयाची 'शंभरी' - Mumbai Indians
आयपीएलमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत मुंबई पहिल्या स्थानी
चेन्नईने दिल्लीविरुद्ध मिळवलेला विजय हा त्यांचा आयपीएलमधील शंभरावा विजय ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासात विजयाचे 'शतक' करणारा चेन्नई हा आजवरचा दुसराच संघ आहे. सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत मुंबईचा संघ अव्वल स्थानी आहे. मुंबईच्या संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक १०८ विजय साजरे केले आहेत.
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळख असलेले हे दोन्ही संघ उद्या (रविवारी) विजेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मुंबई आणि चेन्नईने प्रत्येकी ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे.