महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

उद्यापासून रंगणार आयपीएलचा थरार, धोनी- कोहलीच्या संघांमध्ये पहिली लढत - Indian Premier League

भारताचे आजी-माजी कर्णधार आमनेसामने

ipl

By

Published : Mar 22, 2019, 5:39 PM IST

Updated : Mar 22, 2019, 5:53 PM IST

चेन्नई -आयपीएलच्या बाराव्या हंगामाचा थरार उद्यापासून रंगणार आहे. या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचे आजी- माजी कर्णधार समोरासमोर येणार आहेत. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सबेंगलोर यांच्यात पहिली लढत होणार आहे.



चेन्नईने आयपीएलच्या किताबावर आजवर ३ वेळा नाव कोरले आहे. दुसरीकडे विराटच्या रॉयल चॅलेंजर्सलाएकदाही आयपीएलचा चषक जिंकता आला नाही. त्यामुळे या हंगामात विराटचा संघ विजयी सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असेल. तर गतविजेता चेन्नईचा संघ आपल्या घरच्या मैदानावर संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे या लढतीत बाजी कोण मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कोठे होईल सामना?

चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम मैदानावर हा सामना खेळला जाईल. शनिवारी रात्री ८ वाजता या सामन्यास सुरुवात होईल.

कोणत्या चॅनेलवर हा सामना पाहता येईल?

स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेल्सवरुन हा सामना आपण पाहू शकता. तसेच हॉटस्टारवर आपण हा सामना ऑनलाइन पाहू शकता.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ

एमएस धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, सुरेश रैना, केदार जाधव, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, अंबाती रायडू, मुरली विजय, हरभजन सिंग, दीपक चहर, केएम असिफ, एन जगदिसन, मोनु सिंग, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई, ड्वेन ब्रावो, शेन वॉटसन, फाफ डुप्लेसिस, सॅम बिलिंग्स, इम्रान ताहीर, डेविड विली, मिशेल सॅन्टेनर, लुंगीसानी एन्गिडी, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ

विराट कोहली (कर्णधार), पार्थिव पटेल, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुन्दर, पवन नेगी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलवंत खेरोलिया, मंदीप सिंग, एबी डिव्हिलियर्स, नॅथन कुल्टर-नाईल, मोईन अली, कॉलिन डी ग्रँडहोमे, टिम साऊदी, मार्कस स्टॉयनिस, शिमरन हेटमेयर, देवदुत पड्डीकल, शिवम दुबे, हेन्रीक क्लासेन, गुरकीरत मान सिंग, हिंमत सिंग, प्रयास राय बर्मन.

Last Updated : Mar 22, 2019, 5:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details