महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Fat To Fit : पाकिस्तान कर्णधार सरफराज अहमदचा पाहा फोटो - शोएब अख्तर

विश्वकरंडक स्पर्धेत भारत विरुध्द पराभवानंतर पाकचा कर्णधार सरफराजला चाहत्यांनी ट्रोल तर केलेच याशिवाय 'जाड्या' असे म्हणत जाणीवपूर्वक हेटाळणी केली. यात पाकचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर हाही सहभागी होता. त्याने सरफराज याला पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील अनफिट कर्णधार असे संबोधले. ही टीका सरफराजच्या जिव्हारीला लागल्याने, तो आता 'फिट' रुपाने मैदानात परतला आहे.

Fat To Fit : पाकिस्तान कर्णधार सरफराज अहमदचा पहा फोटो

By

Published : Sep 8, 2019, 9:41 PM IST

कराची - इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील भारत विरुध्द पाकिस्तान सामन्यात पाकचा ८९ धावांनी पराभव झाला. यानंतर संपूर्ण संघासह टीकेचा धनी ठरला तो पाकचा कर्णधार सरफराज अहमद. पराभवानंतर सरफराजला चाहत्यांनी ट्रोल तर केलेच याशिवाय 'जाड्या' असे म्हणत जाणीवपूर्वक हेटाळणी केली. यात पाकचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर हाही सहभागी होता. त्याने सरफराज याला पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील अनफिट कर्णधार असे संबोधले. ही टीका सरफराजच्या जिव्हारीला लागल्याने, तो आता 'फिट' रुपाने मैदानात परतला आहे.

विक्रमांचा धनी विराट कोहली 'या' विषयात आहे 'ढ', स्वतःच दिली कबुली

विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान सरफराजचा फिटनेट नसल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याचा बाहेर आलेल्या पोटाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण आता सोशल मीडियावर सरफराज एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये सरफराज पूर्णपणे फिट दिसत आहे.

पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद पूर्वी आणि आता

बुमराह मैदानावर जादू घडवू शकतो, आफ्रिकन गोलंदाजाने केली स्तुती

दरम्यान, पाकिस्तान संघाला विश्वकरंडक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठता आली नाही. या स्पर्धेत पाकिस्तानचा संघ ९ सामन्यांमध्ये ५ विजयासह ५ व्या क्रमांकावर राहिला. उत्तम रनरेटच्या आधारावर न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details