नवी दिल्ली - रविवारी आयपीएलच्या प्रशासकीय समितीची बैठक पार पडली. यामध्ये आयपीएल-2020 बाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत आयपीएलच्या 13 व्या हंगामाचे आयोजन 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याच्या निर्णय घेण्यात आला.
आयपीएलच्या तेराव्या हंगामांचा रस्ता अखेर मोकळा झाला असून केंद्र सरकारने भारतीय खेळाडूंना युएई प्रवासाची परवानगी दिली आहे. 19 सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र, स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आला असून आता नव्या वेळापत्रकानुसार आयपीएल 2020 चा अंतिम सामना 10 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल.
आयपीएलच्या प्रशासकीय समितीची रविवारी बैठक पार पडली. यात, आयपीएलच्या नियोजनावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच स्पर्धेचे अंतिम वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले. ही स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 53 दिवस चालेल. आयपीएलची फायनल 10 नोव्हेंबर रोजी होईल, ज्यामुळे प्रसारकांना दिवाळीच्या आठवड्याचा फायदा देईल.