नवी दिल्ली -क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने (सीसीआय) कोरोना व्हायरसविरूद्धच्या लढाईत राज्याला मदत करण्यासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीत ५१ लाख रुपये देण्याचे वचन दिले आहे. “आम्ही मुख्यमंत्री मदत निधीसाठी ५१ लाख रूपये देण्याचे ठरवले आहे. संपूर्ण देश विषाणू विरूद्ध लढण्याचा प्रयत्न करीत असल्याने आम्हीसुद्धा याच संघात आहोत. आम्ही आमच्या कर्मचार्यांसाठी ५१ लाख रुपयांची देणगीही दिली आहे”, असे सीसीआय अध्यक्ष प्रेमल उदानी यांनी सांगितले आहे.
कोरोना : सीसीआयकडून महाराष्ट्राला ५१ लाखांची मदत - CCI to donate Rs 51 lakh news
“आम्ही मुख्यमंत्री मदत निधीसाठी ५१ लाख रूपये देण्याचे ठरवले आहे. संपूर्ण देश विषाणू विरूद्ध लढण्याचा प्रयत्न करीत असल्याने आम्हीसुद्धा याच संघात आहोत. आम्ही आमच्या कर्मचार्यांसाठी ५१ लाख रुपयांची देणगीही दिली आहे”, असे सीसीआय अध्यक्ष प्रेमल उदानी यांनी सांगितले आहे.
कोरोना : सीसीआयकडून महाराष्ट्राला ५१ लाखाची मदत
उदानी पुढे म्हणाले, “आम्ही प्रार्थना करत आहोत आणि आमचे सरकारही या विषाणूचा पराभव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मला आशा आहे की एकत्रित मेहनतीने आम्ही या परिस्थितीवर मात करू.”
महाराष्ट्र हे देशातील सर्वात जास्त कोरोनाग्रस्त रूग्ण असलेल्या राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या ३,२३६ झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.