महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

CRICKET WC : भारताविरुद्धच्या पराभवानंतर आयसीसीची कार्लोस ब्रेथवेटवर कारवाई - World Cup

कार्लोसने आपली चुक मान्य केली असून दंडही भरण्यासाठी तयार झाला आहे. या कारणाने या प्रकरणात पुढील कारवाई होणार नाही.

भारताविरुद्धच्या पराभवानंतर आयसीसीची कार्लोस ब्रेथवेटवर कारवाई

By

Published : Jun 28, 2019, 11:47 PM IST

मँचेस्टर - विश्वकरंडक स्पर्धेत गुरुवारी झालेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात भारताने १२५ धावांनी विजयी मिळवला. भारतीय संघाचे २६९ धावांचे आव्हान वेस्ट इंडिज संघाला पेलवले नाही. विंडीजचा संपूर्ण संघ १४३ धावांवर गारद झाला. या पराभवासह वेस्ट इंडिज संघ विश्वचषकातून बाहेर पडला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रेथवेटवर आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली आहे.

सामन्यादरम्यान आयसीसीच्या आचारसंहिता कलम २.८ चे उल्लंघन केल्याने ब्रेथवेटवर ही कारवाई करण्यात आलीय. त्यामुळे ब्रेथवेटला सामन्याच्या मानधनातील १५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. कार्लोसने आपली चुक मान्य केली असून दंडही भरण्यासाठी तयार झाला आहे. या कारणाने या प्रकरणात पुढील कारवाई होणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details