मेलबर्न -रिकाम्या स्टेडियमवर टी-२० वर्ल्डकपची कल्पना करू शकत नसल्याचे मत ऑस्ट्रेलियाचे दिग्गज कर्णधार अॅलन बॉर्डर यांनी दिले आहे. यावर्षी १८ ऑक्टोबरपासून टी-२० वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. परंतु जगभरात कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे या स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट आहे.
कोरोनामुळे बर्याच देशांनी सीमांवर बंदी घातली आहे आणि अशा परिस्थितीत रिक्त स्टेडियममध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते, असे लोकांनी असे सुचवले आहे. पण या मताशी बॉर्डर सहमत नाहीत.