मेलबर्न - पाकिस्तानविरूद्धच्या कसोटी सामन्यात गोलंदाजांची पिसे काढत ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने तुफानी त्रिशतक झळकावले. त्याने या सामन्यात नाबाद ३३५ धावा केल्या. विशेष म्हणजे, वॉर्नरची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याच्या या कामगिरीवर पत्नी कॅन्डीसने महात्मा गांधींचे विचार मांडले आहेत.
हेही वाचा -थरारक!..शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात कर्नाटक विजयी
कॅन्डीसने वॉर्नरच्या पराक्रमाचे ट्विटरवर कौतुक केले असून महात्मा गांधींच्या विचारासंबंधी एक ट्विट पोस्ट केले आहे. 'तुमची ताकद तुमच्या शरीरयष्टीवर समजत नाही, ती तुमच्या इच्छाशक्तीवर असते. लोकं तुमच्यावर विश्वास ठेवतात की नाही, हे महत्त्वाचे नसून तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे, हे महत्त्वाचे आहे', असे कॅन्डीसने या ट्विटमध्ये म्हटले आहे.
चेंडूशी छेडछाड केल्या प्रकरणी वॉर्नरसह स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर वॉर्नरने दमदार पुनरागमन करत टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. वॉर्नर अॅडलेड मैदानावर सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू ठरला. यापूर्वी सर डॉन ब्रॅडमन यांनी या मैदानावर २९९ धावा केल्या होत्या. वॉर्नरने या मैदानावर नाबाद ३३५ धावा केल्या आहेत.