महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून सर्व सामने 'या' तारखेपर्यंत स्थगित - cricket association of bengal latest news

'सर्व विभागीय सामने, शाळा, महाविद्यालये, जिल्हास्तरीय सामने ३१ मार्चपर्यंत होणार नाहीत असे', सीएबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तत्पूर्वी, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने घरच्या मैदानावरील सर्व स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत.

CAB suspends all matches till March 31 due to coronavirus outbreak
बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून सर्व सामने 'या' तारखेपर्यंत स्थगित

By

Published : Mar 15, 2020, 7:30 AM IST

कोलकाता - बंगाल क्रिकेट असोसिएशनने (सीएबी) शनिवारी कोरोना व्हायरसविरुद्ध खबरदारीचा उपाय म्हणून सर्व सामने ३१ मार्चपर्यंत स्थगित केले आहेत. सीएबीने स्पर्धा समिती आणि टेक्निकल समितीची आपत्कालीन बैठक आयोजित केली होती. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा -'खंबीर राहा, योग्य काळजी घ्या, आपण कोरोनाविरुद्ध लढा देऊ'

'सर्व विभागीय सामने, शाळा, महाविद्यालये, जिल्हास्तरीय सामने ३१ मार्चपर्यंत होणार नाहीत असे', सीएबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तत्पूर्वी, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने घरच्या मैदानावरील सर्व स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. मंडळाने शनिवारी निवेदन काढून याबाबत माहिती दिली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आली आहे.

बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला १५ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. यापूर्वी ही स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार होती. कोरोनो व्हायरसमुळे आयपीएलचा १३ वा हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details