कोलकाता - बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (सीएबी) अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी भारतीय क्रिकेट असोसिएशनच्या उपक्रमात (आयसीए) योगदान देण्याचे ठरवले आहे. दालमिया यांच्या जवळच्या सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली. या उपक्रमाद्वारे कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी मदतनिधी उभारला जाणार आहे.
“अविषेक हे नेहमी खेळाडूंना मदत करतात. कठीण काळात त्यांनी आयसीएला मदत करण्याचे आणि ५० हजार रुपये देण्याचे ठरवले आहे,” असे सूत्रांनी सांगितले. क्रिकेटपटू नसलेले अविषेक दालमिया हे या उपक्रमात योगदान देणारे पहिले व्यक्ती आहेत. कपिल देव, सुनील गावस्कर, मोहम्मद अझरुद्दीन आणि राहुल द्रविड यांचा या उपक्रमात समावेश आहे.