महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून यंदाचा स्थानिक हंगाम रद्द - bengal local season called off

कॅबचे अध्यक्ष अभिषेक दालमिया म्हणाले, “बरीच चर्चा झाल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे. संघांच्या खेळाडूंचे आरोग्य महत्त्वाचे आहे. पुढच्या वेळी आम्ही नवीन हंगाम सुरू करू. सध्याचा हंगाम सुरू राहणार नाही." या बैठकीत सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि वैद्यकीय समितीच्या शिफारशींवर विचार केला गेला. स्थानिक क्रिकेट सुरू करण्यासाठी परिस्थिती योग्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर, सदस्यांनी ही बाब मान्य केली.

cab local season called off keeping in mind safety of players
बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून यंदाचा स्थानिक हंगाम रद्द

By

Published : Jun 6, 2020, 5:24 PM IST

कोलकाता -बंगाल क्रिकेट असोसिएशनने (सीएबी) शुक्रवारी खेळाडूंच्या आरोग्याच्या कारणास्तव 2019-20 चा स्थानिक हंगाम रद्द केला आहे. सीएबीने एका निवेदनात ही माहिती दिली. ईडन गार्डन्स येथे झालेल्या स्पर्धा समितीच्या बैठकीनंतर सीएबीने हा निर्णय घेतला.

कॅबचे अध्यक्ष अभिषेक दालमिया म्हणाले, “बरीच चर्चा झाल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे. संघांच्या खेळाडूंचे आरोग्य महत्त्वाचे आहे. पुढच्या वेळी आम्ही नवीन हंगाम सुरू करू. सध्याचा हंगाम सुरू राहणार नाही."

या बैठकीत सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि वैद्यकीय समितीच्या शिफारशींवर विचार केला गेला. स्थानिक क्रिकेट सुरू करण्यासाठी परिस्थिती योग्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर, सदस्यांनी ही बाब मान्य केली.

या निर्णयामुळे चालू हंगामात प्रथम विभाग, द्वितीय विभाग आणि सर्व वयोगटातील स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. स्पर्धा समितीचे अध्यक्ष नितीश रंजन दत्ता म्हणाले, "हंगाम पहिल्या विभाग, द्वितीय विभाग आणि वयोगटातील स्पर्धापासून सुरू झाला होता, परंतु या साथीमुळे सर्व स्पर्धा मध्यभागी थांबवण्यात आल्या. परंतु आम्ही आशा करतो की पुढील सत्रात एक नवीन सुरुवात होईल."

ABOUT THE AUTHOR

...view details