कोलकाता -बंगाल क्रिकेट असोसिएशनने (सीएबी) शुक्रवारी कोरोना दरम्यान स्थानिक क्रिकेटपटूंना प्रशिक्षण सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. कॅबच्या वैद्यकीय समितीने क्रिकेटपटूंना लाळ आणि घाम वापरू नका, असा सल्ला दिला. शिवाय, लहान गटात सराव करण्यात यावा, असेही या सूचनांमध्ये नमूद केले गेले आहे.
आरोग्याच्या हिताचा विचार करता कोरोना नंतर क्रिकेटमध्ये लाळ वापरू नका, अशी शिफारस आयसीसी क्रिकेट समितीने केली आहे. “प्रशिक्षणादरम्यान कोणती खबरदारी घ्यावी आणि कोणत्या प्रोटोकॉलचे अनुसरण करावे याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. आयसीसीच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार केला गेला. काय करावे आणि काय करू नये याची, यादी बनवावी असा निर्णय घेण्यात आला", असे कॅबने एका निवेदनात म्हटले आहे.