नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या हाहाकारामुळे जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. क्रिकेटमधील श्रीमंत असलेली इंडियन प्रीमियर लीगही कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली. कोरोनाचा वाढता आलेख पाहता ही स्पर्धा सुरु होण्याची शक्यता कमी आहे. मात्र विश्वविजेत्या इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर या स्पर्धेबाबत आशावादी आहे. बटलरने या स्पर्धेचा छोटा हंगाम छोटा असू शकतो, असे म्हटले आहे.
यंदाचा आयपीएलचा हंगाम छोटा असू शकतो - बटलर - jos butler latest news
भारतात सध्या २१ दिवसांचा लॉक डाऊन आहे. अशातच ही स्पर्धा खेळवण्यात येण्याची शक्यता कमी आहे. ‘यावेळी कोणतीही बातमी नाही. आयपीएल मोठी स्पर्धा आहे. मात्र, आता ती छोट्या काळासाठी असू शकते’, असे बटलरने एका वृत्तसंस्थेला सांगितले.
यंदाचा आयपीएलचा हंगाम छोटा असू शकतो - बटलर
भारतात सध्या २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. अशातच ही स्पर्धा खेळवण्यात येण्याची शक्यता कमी आहे. ‘यावेळी कोणतीही बातमी नाही. आयपीएल मोठी स्पर्धा आहे. मात्र, आता ती छोट्या काळासाठी असू शकते’, असे बटलरने एका वृत्तसंस्थेला सांगितले.
कोरोनाचे भारतात ६०० रूग्ण आढळून आले असून ११ जणांना जीव गमवावा लागला आहे.