मुंबई - भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. या कारणानेच तो भारत आणि इंग्लंड यांच्यात उद्यापासून (ता. ४) सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. बीसीसीआयच्या सूत्राने याची माहिती एका वृत्त संस्थेला दिली.
भारत आणि इंग्लंड चौथ्या कसोटीपूर्वी जसप्रीत बुमराह याने सुट्टी घेतली. बीसीसीआयने ती मंजूर करताना त्याला रिलीज केले आणि आता तो चौथ्या कसोटीत खेळणार नाही. याशिवाय त्याचा टी-२० मालिकेसाठी निवडलेल्या संघात देखील समावेश नाही. इतकेच नव्हे तर एकदिवसीय मालिकेत देखील खेळणार नसल्याचे वृत्त आहे. सुरूवातीला त्याच्या सुट्टी मागण्यामागे दुखापत किंवा कामाचा ताण हे कारण सांगितले जात होते. पण आता खरे कारण समोर आले आहे. जसप्रीत बुमराह विवाहबंधनात अडकणार आहे. त्यासाठी त्याने ही सुट्टी घेतली आहे.