महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बुमराह आला रे!.. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा - श्रीलंका-ऑस्ट्रेलिया मालिका लेटेस्ट न्यूज

श्रीलंकाविरूद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेत  हिटमॅन रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला संघात स्थान देण्यात आले.

bumrah and dhawan back in squad for sri lanka and australia series
बुमराह आला रे!.. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

By

Published : Dec 23, 2019, 5:51 PM IST

Updated : Dec 23, 2019, 9:42 PM IST

मुंबई -भारतीय संघ जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरूद्ध टी-२० आणि ऑस्ट्रेलिया संघासोबत एकदिवसीय सामन्याची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने संघात पुनरागमन केले आहे. तर, दुखापतग्रस्त शिखर धवनलाही टीम इंडियात स्थान देण्यात आले आहे.

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ

हेही वाचा -आफ्रिकेचा 'हा' वेगवान गोलंदाज होणार निवृत्त, जानेवारीत खेळणार अखेरचा सामना

श्रीलंकाविरूद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेत हिटमॅन रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला संघात स्थान देण्यात आले. यंदाच्या वर्षात रोहितने उत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले असून सततच्या क्रिकेटपासून विश्रांती मिळावी म्हणून रोहितला श्रीलंकाविरुद्ध त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

भारतीय संघ जानेवारी महिन्यात श्रीलंकाविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. ५ जानेवारीला या मालिकेची सुरुवात होईल. श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १४ जानेवारीपासून एकदिवसीय सामन्याची मालिका रंगणार आहे.

बुमराहने वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱया आणि निर्णायक सामन्याआधी भारतीय संघासोबत सराव केला. त्याच्या निवडीबाबतही चर्चा केली जाणार आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, प्रसाद यांचा अध्यक्षतेचा कार्यकाल नविन वर्षात संपणार असून बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी नविन निवड समिती गठित करण्याचे संकेत दिले आहेत.

Last Updated : Dec 23, 2019, 9:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details