विशाखापट्टणम - विराट कोहलीची खेळाप्रती असलेली बांधिलकी पाहता विराट क्रिकेटचा 'ख्रिस्तियानो रोनाल्डो' आहे. अशा शब्दात वेस्ट इंडीजचा माजी महान फलंदाज ब्रायन लारा याने कोहलीचे कौतुक केले.
कसोटी क्रिकेटमध्ये १२ हजारांहून अधिक धावा काढणारा ५० वर्षीय विक्रमवीर लारा म्हणाला की, 'गुणवत्तेच्या बाबतीत विराट लोकेश किंवा रोहित शर्माच्या बरोबरीचा आहे. पण त्याची खेळाप्रती असलेली बांधिलकीची भूमिका महत्त्वाची आहे. त्याच्या तंदुरुस्तीचा दर्जा आणि मानसिक सामर्थ्य अविश्वसनीय आहे. त्यामुळेच क्रिकेटमधील तो रोनाल्डो आहे.'
कोणत्याही युगातील सर्वोत्कृष्ट संघात विराट स्थान मिळवू शकतो. तो क्लाईव्ह लॉईड यांच्या नेतृत्वाखालील १९७० च्या दशकातील संघो असो वा सर डॉन ब्रॅडमन यांचा १९४८ चा विश्वविजेता संघ असो. त्याचे फलंदाजीतील कौशल्य अप्रतिम आहे. त्याला कुठल्याही संघातून वगळले जाऊ शकणार नाही, असेही लारा म्हणाला.