नवी दिल्ली -वेस्ट इंडिजचा महान माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराने भारताचा यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुलविषयी प्रतिक्रिया दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल हा माझा सर्वात आवडता खेळाडू असल्याचे लाराने सांगितले. गेल्या काही वर्षांतील मर्यादित क्रिकेटमधील राहुलचा अर्वणनीय फॉर्म मला त्याची खेळी पाहण्यास प्रवृत्त करतो, असेही लाराने सांगितले.
विराट, धोनी, रोहित नव्हे, तर 'हा' खेळाडू लाराचा लाडका! - Brian Lara on kl rahul
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांच्याशी एका वृत्तवाहिनीवर बोलताना लाराने आपले मत दिले. तो म्हणाला, ''जर तुम्ही दोन संघ खेळत असलेल्या संघाबद्दल बोलत असाल तर केएल राहुलला पाहायला मला आवडते.''
![विराट, धोनी, रोहित नव्हे, तर 'हा' खेळाडू लाराचा लाडका! Brian Lara picks his favourite international cricketer](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9860341-thumbnail-3x2-dfgf.jpg)
विराट, धोनी, रोहित नव्हे, तर 'हा' खेळाडू लाराचा लाडका!
हेही वाचा -सचिनच्या नावावर होणार स्टेडियम...खासदार मनोज तिवारी यांचा निर्धार
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पाँटिंग याच्याशी एका वृत्तवाहिनीवर बोलताना लाराने आपले मत दिले. तो म्हणाला, ''जर तुम्ही दोन संघ खेळत असलेल्या संघाबद्दल बोलत असाल, तर केएल राहुलला पाहायला मला आवडते. जगात जोफ्रा आर्चरही उत्कृष्ट आहे, निकोलस पूरणही या यादीत आहे. पण, राहुलला मी प्राधान्य देतो.''