मुंबई - वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लाराच्या छातीत दुखत असल्यामुळे त्याला सकाळी साडे बाराच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये हलवले होते. डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी लाराची अँजिओग्राफी केली. या चाचणीमधून लाराच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अँजिओग्राफीमध्ये काहीही गंभीर न आढळल्यामुळे त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्याची किंवा पुढील उपचारांसाठी त्याला रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ब्रायन लाराच्या प्रकृतीला कुठलाही धोका नाही, अँजिओग्राफीनंतर डॉक्टरांनी दिली माहिती - hospital
अँजिओग्राफीमध्ये काहीही गंभीर न आढळल्यामुळे त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्याची किंवा पुढील उपचारांसाठी त्याला रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
![ब्रायन लाराच्या प्रकृतीला कुठलाही धोका नाही, अँजिओग्राफीनंतर डॉक्टरांनी दिली माहिती](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3661888-264-3661888-1561472135586.jpg)
आपल्या शैलीदार डावखुऱ्या फलंदाजीसाठी ओळखला जाणारा लारा एकेकाळी वेस्ट इंडिजच्या फलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ होता. लारा आता ५० वर्षांचा आहे. लारा सध्या वर्ल्ड कप व इतर सामन्यांमध्ये समालोचकाचे काम पाहतो. लाराने नव्वदच्या दशकात आपल्या फलंदाजीने जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला होता.
मुंबईत ब्रायन लाराला ऍडमिट केले म्हणून माध्यमावर मोठी चर्चा होती. मात्र त्याचा चाहत्यांनी काळजी करण्याचे कारण नसून, तो आता नॉर्मल आहे. त्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात येत असून चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.