मेलबर्न -नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताला नमवत विश्वविजेतेपद पटकावले. अंतिम सामना वगळता भारताने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. १६ वर्षाची 'लेडी सेहवाग' शफाली वर्मा या स्पर्धेतून नावारूपास आली. गुणवत्तेला वयाचे बंधन नसते हे तिच्या कामगिरीमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या स्पर्धेदरम्यान, भारतीय वंशाच्या अजून एका क्रिकेटपटूने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तिचे वय आणि क्रिकेटमधील कौशल्य हे खरच अवर्णनीय म्हणावे लागेल.
६ वर्षाच्या पोरीकडून ब्रेट लीची धुलाई!.. पाहा व्हिडिओ - ब्रेट ली-तनिषा सेन क्रिकेट व्हिडिओ न्यूज
तनिषा सेन असे या 'छोट्या' क्रिकेटपटू मुलीचे नाव आहे. तनिषा फक्त ६ वर्षाची असून तिचा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ब्रेट ली सोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान हिट ठरतोय.
तनिषा सेन असे या 'छोट्या' क्रिकेटपटू मुलीचे नाव आहे. तनिषा फक्त ६ वर्षाची असून तिचा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ब्रेट लीसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान हिट ठरतोय. तिची फलंदाजी पाहून ब्रेट लीला खुद्द सचिन तेंडुलकरची आठवण झाली. 'ही मुलगी सचिनसारखी खेळत असल्याने मला भीती वाटतेय', असे ब्रेट लीने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
या छोट्या तनिषाने फलंदाजीदरम्यान ब्रेट लीचा खरपूस समाचार घेतला. माझा आवडता शॉट कव्हर ड्राइव्ह असून स्मृती मंधाना ही आवडती खेळाडू असल्याचे तनिषाने मुलाखतीत म्हटले आहे.