सिडनी -ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हटले आहे. लीने सचिनला वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारापेक्षा वरचढ ठरवले. तर, दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिस हा लीच्या दृष्टीने एक उत्तम पूर्ण क्रिकेटपटू आहे.
ब्रेट लीने सांगितले जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचे नाव, विराटला वगळले
झिम्बाब्वेचा माजी गोलंदाज पोमी म्बांगवाशी बोलताना लीने आपली प्रतिक्रिया दिली. ली म्हणाला, "सचिनचा विचार केला तर असे वाटते की त्याच्याकडे बराच वेळ आहे. माझ्या गोलंदाजीवेळी त्याच्याकडे खूप वेळ असायचा.''
झिम्बाब्वेचा माजी गोलंदाज पोमी म्बांगवाशी बोलताना लीने आपली प्रतिक्रिया दिली. ली म्हणाला, "सचिनचा विचार केला तर असे वाटते की त्याच्याकडे बराच वेळ आहे. माझ्या गोलंदाजीवेळी त्याच्याकडे खूप वेळ असायचा. तो आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. सचिननंतर लाराचा नंबर लागतो. तो खूप आक्रमक होता. तुम्ही त्याला कितीही वेगवान चेंडू टाका. तो तुम्हाला विविध ठिकाणी षटकार ठोकू शकतो."
ली पुढे म्हणाला, "जेव्हा तुम्ही महान फलंदाजांविषयी बोलता तेव्हा लारा आणि सचिन खूप जवळचे वाटतात. मला वाटते सचिन सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे, पण दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस हा पूर्ण क्रिकेटपटू आहे."