मुंबई - भारतात सध्या आयपीएलचा फिव्हर सुरू आहे. जगभरातील दिग्गज खेळाडू जलावा दाखवत आहेत. यात माजी दिग्गज खेळाडूही उपस्थित राहून आयपीएलचा आनंद घेत आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट ली आणि विंडीजचा स्टार फलंदाज ब्रायन लारा हेदेखील सध्या भारताच्या दौऱ्यावर असून ते समालोचकाच्या भूमिकेत काम करत आहेत.
आयपीएलच्या व्यस्त वेळापत्रकात ते वेळ काढून फॅन्ससोबत वेळ घालवत आहेत. थकवा दूर करण्यासाठी दोन्ही खेळाडू मुंबईमध्ये गली क्रिकेट खेळताना दिसून आले. यात ब्रेट लीने ब्रायन लाराला बाउंसर चेंडू टाकला ते पाहून चाहते अंचबित झाले. तसेच ब्रेट लीने दुसरा यॉर्कर चेंडू एका लोकल बॉयला टाकला त्यात तो क्लीन बोल्ड झाला. यानंतर ब्रेट ली त्याच्या स्टाईलमध्ये आनंद साजरा करताना दिसून आला.
लीने त्याचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देत लिहिले की मुंबईमध्ये ब्रायन लारासोबत २ षटकाची गली क्रिकेट मॅच. यापूर्वी बंगळुरूमध्ये इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन आणि ग्रॅमी स्मिथ हे गली क्रिकेट खेळताना दिसून आले. ज्याचे व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.