कोलकाता -आयपीएलच्या दोन हंगामाचा विजेता असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमला केकेआरच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा भार सोपवण्यात आला आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या क्रिकेट संघाने ट्विटरद्वारे ही घोषणा केली.
आयपीलच्या पहिल्या हंगामात ब्रेंडन मॅक्क्युलम हा कोलकाता संघातून खेळला होता. त्याने पहिल्याच सामन्यात बंगळुरु संघाविरुद्ध केलेली १५८ धावांची खेळी अजूनही लोकांच्या लक्षात आहे. २०१६ आणि २०१८ मधील करेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) आणि त्रिनबागो नाइट राइडर्स या संघाचाही मॅक्क्युलम भाग होता.