नवी दिल्ली - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली दहशतवादी संघटनेच्या हिटलिस्टवर असल्याची, गंभीर बाब समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) च्या हाती यासंदर्भातील काही कागदपत्रे लागली असून या कागदपत्रात देशातील १२ नामांकित व्यक्तींच्या जीवाला धोका असल्याचे समजते. गंभीर बाब म्हणजे, ही यादी ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने तयार केली आहे.
'कॅप्टन' विराट कोहली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर... - breaking news
ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबाने तयार केलेल्या यादीनुसार, प्रथम क्रमांकावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. याच यादीत विराट कोहलीचेही नाव असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या यादीत, प्रथम क्रमांकावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. याच यादीत विराट कोहलीचेही नाव असल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, अद्याप या यादीत विराट कोहलीचे नाव कोणत्या कारणामुळे आले याबद्दलची कोणतीही माहिती सुरक्षा यंत्रणांकडून समोर आलेली नाही.
दरम्यान, ३ नोव्हेंबरपासून भारत-बांगलादेश संघामध्ये टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळवण्यात येणार आहे. त्यात एनआयए रिपोर्टमुळे दिल्ली पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून विराट कोहलीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
TAGGED:
breaking news