नवी दिल्ली -ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगने २०११ ते २०२० मधील सर्वोत्तम कसोटी संघाची निवड केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हॉगने त्याच्या संघात फक्त एका भारतीय खेळाडूचा समावेश केला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका संघाचे प्रत्येकी तीन, इंग्लंडचे दोन, पाकिस्तान आणि न्यूझीलंडमधील प्रत्येकी एक खेळाडू संघात निवडण्यात आला आहे.
सलामीवीर म्हणून हॉगने इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुक आणि स्फोटक डेव्हिड वॉर्नरला स्थान दिले आहे. तिसऱ्या क्रमांकावर, हॉगने केन विल्यम्सनची निवड केली आहे. शिवाय संघाचे नेतृत्वही विल्यम्सनकडे सोपवले आहे. चौथ्या क्रमांकावर भारतीय कर्णधार विराट कोहली तर पाचव्या स्थानावर स्टीव्ह स्मिथ आहे.
हेही वाचा - भारत वि. ऑस्ट्रेलिया : तब्बल १३२ वर्षांनी घडला असा प्रकार