लंडन -विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना रोमांचक ठरला. हा सामना सुपर ओव्हरमध्येही अनिर्णित राहिल्याने सर्वाधिक चौकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले. यानंतर आयसीसीच्या सुपर ओव्हरच्या 'जाचक' नियमावर जगभरातून राग व्यक्त करण्यात आला. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाही हा नियम मान्य नाही. इंग्लंडच्या विजयानंतर त्यांनी आयसीसीला ट्विटरच्या माध्यमातून धारेवर धरले आहे.
सुपर ओव्हरच्या नियमावर अमिताभ बच्चनही नाराज; 'असा' दिला टोला - england vs new zealand
बिग बी यांनी आपल्या ट्विटरवर आयसीसीच्या नियमांवर टीका करत पोस्ट शेअर केली आहे.
'इसीलिए माँ कहती थी कि "चौका" बरतन आना चाहिए', बिग बींचा आयसीसीला टोला.
बिग बी यांनी आपल्या ट्विटरवर आयसीसीच्या नियमांवर टीका करत पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणाले, 'तुमच्याकडे 2000 रुपये आहेत, माझ्याकडे 2000 रुपये आहेत. तुमच्याकडे 2000 ची नोट आहे, माझ्याकडे 500 च्या 4 नोटा आहेत, तर सर्वात श्रीमंत कोण? आयसीसी म्हणते - ज्याच्याकडे 500 च्या 4 नोटा तो श्रीमंत आहे.'
दुसऱ्या ट्विटमध्ये बच्चन म्हणाले, म्हणूनच आई म्हणायची की 'चौका' बरतन यायला पाहिजे.