मुंबई -आयपीएलच्या संभाव्यतेविषयी निर्णय घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) लीग फ्रँचायझीसमवेत कॉन्फरन्स कॉलवर चर्चा करणार आहे. बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
आयपीएल होणार की नाही?...'कॉन्फरन्स कॉल'वर होणार निर्णय!
क्रिकेटमधील 'श्रीमंत स्पर्धा' म्हणून ख्याती असलेल्या आयपीएलचा निर्णय कॉन्फरन्स कॉलवरून होणार आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही चर्चा येत्या मंगळवारी होणार असल्याचे वृत्त आहे. क्रिकेटमधील 'श्रीमंत स्पर्धा' म्हणून ख्याती असलेल्या आयपीएलचा निर्णय कॉन्फरन्स कॉलवरून होणार आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सद्य परिस्थिती पाहता आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे १० हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगातील १५० हून अधिक देशांमध्ये या विषाणूचा फैलाव झाला असून जगभरात दीड लाखांहून अधिक लोकांना यांची लागण झाली आहे. भारतातही कोरोनाचे १६८ हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर या विषाणूमुळे भारतात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने यावर उपाययोजना करत आहे.