मुंबई -आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयात खरेदी केलेला जम्मू काश्मीरचा युवा वेगवान गोलंदाज रसिख सलामवर बीसीसीआयने २ वर्षाच्या बंदी घातली आहे. जन्म दाखल्यात चुकीचे वय दाखवल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलीय.
मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूवर बीसीसीआयने घातली २ वर्षाची बंदी
२ वर्षाच्या बंदीची कारवाई करण्यात आल्याने रसिख आगामी इंग्लंडमध्ये होणाऱ्या अंडर १९ तिरंगी मालिकेतुन बाहेर पडला आहे.
मुंबई इंडियन्स
२ वर्षाच्या बंदीची कारवाई करण्यात आल्याने रसिख आगामी इंग्लंडमध्ये होणाऱ्या अंडर १९ तिरंगी मालिकेतुन बाहेर पडला आहे. त्याच्या जागी बीसीसीआयने प्रभात मौर्य या खेळाडूची भारतीय अंडर १९ संघात निवड केली आहे.
रसिखने आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी १ सामना खेळला आहे. या सामन्यात सलामने ४ षटके टाकताना ४२ धावा दिल्या होत्या.