मुंबई- भारतीय संघाचा माजी कर्णधार बिशन सिंह बेदी यांनी म्हटले आहे, की महेंद्र सिंह धोनी संघाचे अर्धे कर्णधारपद सांभाळतो, कोहली त्याच्याशिवाय चौथ्या एकदिवसीय सामन्यात असमर्थ वाटत होता. धोनीला चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी आराम देण्यात आला आहे. त्याच्याजागी ऋषभ पंत यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे.
'धोनी संघाचे अर्धे कर्णधारपद सांभाळतो, त्याच्याशिवाय कोहली असमर्थ'
भारतीय संघाचा माजी कर्णधार बिशन सिंह बेदी यांनी म्हटले आहे, की महेंद्र सिंह धोनी संघाचे अर्धे कर्णधारपद सांभाळतो, कोहली त्याच्याशिवाय चौथ्या एकदिवसीय सामन्यात असमर्थ वाटत होता.
बिशन सिंह बेदी म्हणाले, मी प्रतिक्रिया देणारा कोण ठरतो?, परंतु, धोनीला आराम दिल्यानंतर आम्ही सर्व हैरान होतो. चौथ्या एकदिवसीय सामन्यात यष्टीरक्षणात, फलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणात धोनीची उणीव भासली. धोनी एकप्रकारे संघाचा अर्धा कर्णधार आहे. धोनी सध्या युवा खेळाडू नाही. पूर्वीसारखा चपळ तो राहिला नाही. परंतु, संघाला त्याची गरज आहे. त्याच्या उपस्थितीत संघ शांतपणे खेळतो. कर्णधारालाही त्याची गरज वाटते, त्याच्याशिवाय कर्णधार असमर्थ दिसून येतो.
विश्वकरंडक स्पर्धेआधी करण्यात आलेल्या प्रयोगाविषयी बोलताना बेदी म्हणाले, वैयक्तीक स्तरावर वर्तमान काळात जगायला मला आवडते. विश्वकरंडकात आणखीन अडीच महिने आहेत. संघाने आपला नैसर्गिक खेळ केला पाहिजे. विश्वकरंडकासाठी गेल्या दीड वर्षापासून आपण तयारी करत आहोत. यावर मी अजिबात आनंदी नाही.