जयपूर - आयपीएलमध्ये गुरुवारी चेन्नई आणि राजस्थान यांच्यात खेळल्या सामन्यात धोनीच्या चेन्नईने ४ विकेट राखुन रोमहर्षत विजय साजरा केला. या विजयासह धोनीच्या संघाने गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. या सामन्यात सुपर किंग्जचा कर्णधार धोनीने ५८ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. मात्र, या सामन्यात धोनीच्या खेळीपेक्षा आणि चेन्नईच्या विजयापेक्षा चर्चा झाली ती कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मैदानावरील 'त्या' कृत्याची.
धोनीला झालेला दंड कमी असून त्यातुन त्याला कोणताही धडा मिळणार नाही - बिशन सिंग बेदी - Chennai Super Kings
कोणताही खेळाडू खेळापेक्षा मोठा नसल्याचा बेदी यांनी धोनीला लगावला टोला
खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईला अखेरच्या षटकामध्ये विजयासाठी १८ धावांची गरज होती. या षटकात बेन स्टोक्सने टाकलेला चौथा चेंडू पंचांनी 'नो बॉल' न दिल्याने, मैदानाबाहेर उभा असलेला धोनी संतापून चालू सामन्यात मैदानात येउन पंचांना जाब विचारु लागला. मैदानात आणि मैदानाबाहेर आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जाणाऱ्या धोनीचे हे 'अँग्री' रूप पाहुन सर्वांनाच धक्का बसला होता. या प्रकरणात कारवाई म्हणून धोनीला सामन्यातील ५० टक्के मानधनाचा दंड आयपीएलकडून करण्यात आला आहे.
सर्व नियम धाब्यावर बसवुन धोनीने केलेल्या या कृत्यानंतर अनेक दिग्गजांनी धोनीवर टीकास्त्र सोडले आहे. भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी म्हटले आहे, की धोनीला झालेला दंड अत्यंत कमी असून त्यातुन त्याला कोणताही धडा मिळणार नाही. कोणताही खेळाडू हा खेळापेक्षा मोठा नसल्याचा टोलाही बेदी यांनी लगावला. तसेच ते म्हणाले की, या प्रकरणातील संबधीत अधिकाऱ्यांनीही चुकीची आणि घाबरट भूमिका घेतली आहे.