महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

HappyBirthdayHitman: जाणून घ्या रोहित शर्माचे अनोखे विक्रम - important records

रोहित हा एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल तीनवेळा द्विशतके झळकावली आहेत.

रोहित शर्मा

By

Published : Apr 30, 2019, 2:31 PM IST

मुंबई - क्रिकेटविश्वात 'हिटमॅन' अशी ओळख असलेला भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माचा आज ३२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात रोहितने क्रिकेटमध्ये केलेले काही अनोखे विक्रम...

  • रोहित हा एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल तीनवेळा द्विशतके झळकावली आहेत.
  • एकदिवसीयमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम हा हिटमॅन रोहितच्या नावावर आहे. त्याने २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एका सामन्यात २६४ धावांची वादळी खेळी केली होती.
  • एकदिवसीयमध्ये एकाच डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियातविरुद्धच्या वनडे सामन्यात १६ षटकार लगावले होते.
  • वनडे क्रिकेटमध्ये एकाच डावात सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रमही रोहित शर्माच्याच नावावर आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात ३३ चौकार मारले होते.
  • क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये शतक करणारा रोहित हा दुसरा भारतीय आहे. याआधी सुरेश रैनाने ही कामगिरी केली आहे. त्याने २०१०च्या ट्वेंटी-२० विश्वकरंडकामध्ये शतक ठोकले होते.
  • क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतकी खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहितचे नाव आहे. तसेच तिन्ही प्रकारात शतके करणारा रोहित हा सुरेश रैनानंतरचा दुसरा भारतीय फलंदाज आहे.
  • एकदिवसीयमध्ये २०० षटकार मारणारा रोहित हा धोनीनंतर दुसरा भारतीय फलंदाज आहे. सध्या रोहितच्या नावावर २०६ सामन्यांमध्ये २१८ षटकार आहेत.
  • वादळी खेळीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माने गोलंदाज म्हणून आयपीएलमध्ये हॅटट्रिक साजरी केली आहे. त्याने २००९च्या आयपीएलमध्ये डेक्कन चार्जसकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅटट्रिक साजरी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details