महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

KKR ला दिलासा; सुनील नरेला मिळाली क्लिनचीट... - Narine cleared of suspect bowling ACTION NEWS

कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार गोलंदाज सुनील नरेनच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शन विरोधात तक्रार करण्यात आली होती. यात अ‌ॅक्शन समितीने नरेनला क्लिनचीट दिली आहे.

Big boost for KKR as Sunil Narine cleared of suspect bowling ACTION
KKR ला दिलासा, सुनील नरेला मिळाली क्लिन चीट, जाणून घ्या प्रकरण

By

Published : Oct 18, 2020, 4:46 PM IST

दुबई -कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार गोलंदाज सुनील नरेनच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शन विरोधात तक्रार करण्यात आली होती. यात अ‌ॅक्शन समितीने नरेनला क्लिनचीट दिली आहे. यामुळे नरेनचा मार्ग मोकळा झाला आहे.

सुनील नरेनच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनच्या तक्रारीबद्दल आयपीएल व्यवस्थापनाकडून माहिती देण्यात आली होती. यात त्यांनी, मैदानातील पंच उल्हास गांधी आणि ख्रिस गफाणे यांनी नरेनच्या संशयित गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनविरुद्ध अहवाल तयार केला असून यात सुनील नरेनला ताकीद देत इशारा यादीत टाकण्यात आले आहे. असे असले तरी, नरेनला गोलंदाजीची परवानगी देण्यात आली आहे, असे व्यवस्थापनाने म्हटले होते. आता अ‌ॅक्शन समितीनेच नरेनला क्लिनचीट दिली आहे. यामुळे नरेन केकेआरसाठी पुन्हा खेळताना दिसेल.

याबाबत आज आयपीएलकडून माहिती देण्यात आली आहे. यात त्यांनी आयपीएलमध्ये संशयित बॉलिंग अ‌ॅक्शन समितीने नरेनला क्लिनचीट दिली आहे, असे म्हटलं आहे. याआधी देखील नरेन विरोधात अशीच तक्रार दाखल करण्यात आली होती.

हेही वाचा -आयपीएल २०२० : गुणतालिकेत 'वरचढ' होण्यासाठी कोलकाता-हैदराबाद भिडणार

हेही वाचा -ई-सिगारेट पिताना आढळला बंगळुरूचा स्टार फलंदाज... पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details