मेलबर्न -अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू राशिद खान सध्या त्याच्या नवीन बॅटमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. बीबीएल स्पर्धेत अॅडलेड स्ट्रायकर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात राशिद एका नवीन बॅटने खेळला. ही बॅट एका उंटाच्या आकारासारखी होती.
सनरायजर्स हैदराबादने केलेले ट्विट हेही वाचा -'विस्डेन'चा दशकातील सर्वोत्तम टी-२० संघ जाहीर, मोठ्या क्रिकेटपटूंना वगळले
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या बॅटचा फोटो शेअर केला आहे. आणि या बॅटला 'द कॅमल' असे नाव दिले. या बॅटवर आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद या संघानेही ट्विट केले. 'राशिद, आयपीएलमध्ये येताना ती बॅट घेऊन ये', असे ट्विट हैदराबादने केले आहे.
बीबीएलमधील या सामन्यात राशिदने २५ धावा ठोकल्या. या धावा करताना त्याने १६ चेंडूचा सामना केला. राशिदने या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार लगावले. इतकेच नव्हे तर त्याने चार षटकांत १५ धावा देऊन दोन बळीही टिपले.